17 December, 2016

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

हिंगोली, दि.17:  राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे रविवार, दिनांक 18 डिसेंबर, 2016 रोजीच्या हिंगोली दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.
रविवार, दिनांक 18 डिसेंबर, 2016 रोजी 1-45 वाजता हेलिकॉप्टरने कडोळी ता. सेनगाव जि. हिंगोलीकडे प्रयाण. 2-45 वाजता गट क्रमांक 358 मौ. कडोळी हेलिपॅड येथे आगमन. 2-50 वाजता मोटारीने रमतेराम महाराज विद्यालय प्रांगणाकडे प्रयाण. 2-55 वाजता श्री. रमतेराम महाराज विद्यालय प्रांगण, कडोळी जि. हिंगोली येथे आगमन व राष्ट्रऋषी नानाजी देशमुख जन्मशताब्दी समारोह कार्यक्रमास उपस्थिती (श्री. सुमित वानखेडे , विकाअ) (श्री. तान्हाजी मुटकूळे , आमदार 9665368999) . 4-05 वाजता श्री. रमतेराम महाराज विद्यालय प्रांगण येथून हेलिपॅडकडे प्रयाण. 4-10 वाजता हेलिपॅड येथे आगमन . 4-15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करतील.


****

No comments: