17 December, 2016

23 डिसेंबर रोजी हिंगोली येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
हिंगोली, दि. 17 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, हिंगोली व खाकीबाबा मेमोरीयल इंग्लीश स्कुल, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करावयाचे आहे. या युवा महोत्सवाचे आयोजन दि. 23 डिसेंबर, 2016 रोजी खाकीबाबा मेमोरीयल इंग्लीश स्कुल, रामलीला मैदान, हिंगोली येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी कला प्रकार कलाकारांची संख्या खालील प्रमाणे आहे.
अ.क्र
कला प्रकार
कलाकाराची संख्या    (सहकलाकारांसह)
अ.क्र
कला प्रकार
कलाकाराची संख्या    (सहकलाकारांसह)
1
लोकनृत्य
20
6
शास्त्रीय नृत्य

2
लोकगीत
10

मणिपुरी
01
3
एकांकिका (इंग्रजी किंवा हिंदी)
12

ओडीसी
01
4
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी)
01

भरतनाट्यम
01
5
शास्त्रीय वाद्य( हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी)

कथ्थक
01

सितार
01

कुचीपुडी
01
बासरी
01
7
वकृत्व (हिंदी किंवा इंग्रजी)
01
वीणा
01

एकुण
56
तबला
01



मृदंग
01



हार्मोनियम(लाईट)
01



गिटार
01



जिल्ह्यातील युवक-युवतींना कलाप्रकारामध्ये कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवती,युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होऊ शकतात. युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या प्रवेशीका मंडळाच्या/शाळेच्या/कॉलेजच्या लेटरपॅडवर  कलाकाराचे नांव, जन्म तारीख व स्वाक्षरी इत्यादी माहिती भरुन दि. 22 डिसेंबर 2016 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा, हिंगोली येथे सादर कराव्यात. यासाठी स्पर्धकांनी आपल्या जन्मतारखेचा पुरावा सादर करावा लागेल. उशीराने आलेल्या प्रवेशीका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रत्येक कलाकाराने त्यांना आवश्यक असणारे वेशभुषा, ड्रेस,साहित्य, वाद्य, मेकअप साहित्य प्रत्येकाने स्वत:चे आणावे. तसेच सी.डी कॅसेटस,डि.व्ही.डी, यावर कला सादर करता येणार नाही. कला सादर करताना कुठल्याही प्रकारची इजा दुखापत अथवा गंभीर इजा झाल्यास आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संघ व्यवस्थापक व कलाकार यांची राहिल.तसेच पंचानी दिलेला निर्णय हा अंतिम राहिल.
हिंगोली जिल्हयातील युवक-युवतीनी या युवक महोत्सवात जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होऊन आपले कला गुण  सादर करावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: