29 December, 2016

जिल्हा शासकीय रुग्णालयात
पीसीपीएनडीटीची जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न
हिंगोली, दि. 29 :-  येथील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात जिल्हा शल्य चिकित्सक आकाश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. रोडगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी विवेक डावरे, सामाजिक कार्यकर्ता धरमचंद्र बडेरा, श्रीमती आरती मार्डीकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. डी.एन. मोरे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक आकाश कुलकर्णी यांनी पीसीपीएनडीटी विभागाच्या कामकाजाचा आढावा व नवीन प्रस्तावित सोनोग्राफी केंद्रास मान्यतेसंदर्भात आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली . तसेच जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व हिंगोली येथे पशुवैद्यकीय सोनोग्राफी केंद्र मिळण्याबाबत प्रस्तावाबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
तसेच नवीन सोनोग्राफी मशिन खरेदी करण्याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून योग्य ते मार्गदर्शनही मागविण्यात यावे , याबाबतही यावेळी सुचना देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आरती मार्डीकर व धरमचंद्र बडेरा यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रम आयोजनाबाबतही यावेळी सुचविण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शैक्षणिक पात्रता व प्राप्त झालेले सोनोग्राफी केंद्राचे प्रस्तावाबाबत योग्य तो विचार करण्याबाबतही यावेळी या बैठकीत चर्चा करण्यात करण्यात आली .
तसेच सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. श्रीमती सुकेशिनी ढवळे यांनी मानले.

*****

No comments: