16 December, 2016

जिल्हाधिकारी भंडारी यांची एसबीएच बँकेला भेट

          हिंगोली, दि. 16 :- पाचशे हजारच्या नोटबंदी मुळे बँकावर कामाचा ताण वाढला आहे, परंतु या परिस्थितीत ही जिल्ह्यातील सर्व बँका चांगले काम करत असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबादला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
            श्री. भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांना पीककर्ज सप्टेंबर महिन्यात देण्याऐवजी माहे एप्रिल महिन्यात पीककर्जाची प्रक्रिया करून माहे जूनमध्ये उपलब्ध होईल अशी सूचना येथील बँक व्यवस्थापक व बँकेतील कर्मचारी यांना केली. तसेच नोटबंदी, पीककर्ज, पीओएस मशीन व एटीएम विषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी बँकेचे व्यवस्थापक जयबीर सिंग यांच्याशी चर्चा करून चलनी नोटा संदर्भात स्टेट बँक ऑफ हैदराबाद या शाखेच कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगितले व पुढील कार्यासाठी बँकेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
*****




No comments: