05 April, 2018

जिल्ह्यात कलम 144 लागू


जिल्ह्यात  कलम 144 लागू
हिंगोली, दि.05: हिंगोली जिल्हा मुख्यालयी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 हि दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 01.00 व  दुपारी 3.00 ते 5.00 या  वेळेत घेण्यात येणार आहे. या कालावधीत हिंगोली  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग अ, आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग ब, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल, हिंगोली आणि सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करीत आहे. तसेच वरील परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 ते सायंकाळी 06.00 या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे निर्बंध घालण्यात येत आहेत.
परीक्षा उपकेंद्राचे इमारती व परिसर यामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मिटर  परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी बंदोबस्तासाठी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना परवानगी दिलेली आहे. अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, पेजर, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यास बंदी   असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
000000

बालगृह संस्थांनी अनाथ प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करावेत


बालगृह संस्थांनी अनाथ प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करावेत
                                                        - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
हिंगोली, दि.05: बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमातंर्गत राज्यामध्ये कार्यरत शासकीय / स्वयंसेवी बालगृहांमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि विशेष लाभ मिळत नसल्यामुळे अशा लाभार्थ्यांना  अनाथ असल्याचे प्रमाणपत्र शासन निर्णयान्वये महिला व बाल विकास विभाग दि. 6 जून, 2016 नुसार निर्गमीत  करण्यात आले आहे .
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमातंर्गत हिंगोली जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागातंर्गत कार्यरत स्वयंसेवी बालगृहांमधून बाहेर पडलेल्या अनाथ प्रवेशितांनी त्यांचे शेवटच्या वास्तव्यास असलेल्या  संस्थेशी संपर्क साधून ते अनाथ असल्याचे प्रस्ताव त्या संबंधीत संस्थेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे .
0000

04 April, 2018


‘उभारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण

        हिंगोली,दि.04: आत्मत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या मानसिक धैर्याला व त्यांच्या कुटुंबियांच्या सबलीकरणासाठी शासन, प्रशासन सर्व पद्धतीचे सहकार्य करण्यासाठी मराठवाडा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या सकंल्पनेतून ‘उभारी’ या उपक्रमातंर्गत आज जिल्ह्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुंटूंबीयांची अधिकाऱ्यांनी भेट घेतली.
            या उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळमनुरी तालूक्यातील मौ. डोंगरगावपुल येथील मयत शेतकरी संजय भानुदास साखरे आणि मौजे येलकी येथील मयत शेतकरी विठ्ठल जगदेव माने यांच्या कुंटूंबीयांची आज भेट घेवून त्यांच्या समस्या जाणुन घेवून त्यांच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत यांची माहिती घेतली.
            यावेळी मौ. डोंगरगावपुल येथील मयत शेतकरी संजय भानुदास साखरे यांच्या कुंटूंबीयांकडे शेती असून त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याची इच्छा असून त्याकरीता शेळी, गाई-म्हशी या योजनेचा लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे केली. सदर कुटूंबाच्या मागणीनुसार त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधीतांना सूचना दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ देवून मुलांच्या शिक्षणासाठी सिध्दीविनायक न्यास अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याबाबत तहसीलदार यांना जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी सूचना दिल्या.
            मौजे येलकी येथील मयत शेतकरी विठ्ठल जगदेव माने यांच्या कुंटूंबीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी त्यांना रेशीम शेती करण्याबाबत प्रवृत्त केले असता त्यांनी त्यास सहमती दर्शवीली. त्यानुसार या कुंटूंबाला तात्काळ रेशीम शेती करण्याकरीता योजनेचा लाभ देण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारी यांनी संबंधीतांना सूचना दिल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या मानसिक धैर्याला उभारी देवून त्यांच्या कुंटुंबाना सक्षम करण्यासाठी शासन, प्रशासन सर्व पद्धतीचे सहकार्य करणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्यक्ष जाऊन अधिकारी भेटणार असून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंब ठरविण्याचे निकष, घर आणि शेतजमीन, कर्जाची उपलब्धता, उपजीविकेसंबंधीचे प्रश्न, सरकारी योजनांचा लाभ, वारसा नोंदी, शेतीच्या योजनांचा लाभ, महिलांचे अर्थसहाय्य/ बँक कर्जाबाबतचे प्रश्न, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे आरोग्य व उपजीविका आदीबाबात या उभारी उपक्रमातंर्गत शासन प्रशासन सहकार्य करणार असल्याचे ही श्री.  भंडारी यावेळी म्हणाले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन पांडुरंग बोरगावकर आणि तहसीलदार प्रतीभा गोरे आदींची उपस्थिती होती.

 

*****

03 April, 2018

राज्यसेवा पूर्व परीक्षा-2018 जिल्ह्यातील 04 उपकेंद्रावर


राज्यसेवा पूर्व परीक्षा-2018 जिल्ह्यातील 04 उपकेंद्रावर

हिंगोली, 03: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 रविवार दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळात हिंगोली जिल्हा मुख्यालयी 04 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी 04 उपकेंद्रावर (एकूण 1152 परीक्षार्थी) परीक्षा देणार आहेत.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर  डिजिटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली  कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दूरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तू, बॅग्ज अथवा  आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यास आयोगामार्फत सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी  परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर फक्त पेन, पेन्सिल , प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा  मूळ पुरावा  व त्याची छायाप्रत अथवा  प्रवेश केंद्रावर प्रवेश देण्यात येईल . परीक्षा केंद्रावर बंदोबस्त  लावण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेश दारावर पोलीसांमार्फत  तपासणी  करण्यात येणार आहे .
सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे मोबाईल फोन/दूरसंचार साधनांसह आयोगाने बंदी  घातलेले इतर कोणतेही साहित्य आढळून आल्यास तसेच  कॉपीचा /गैरप्रकाराचा प्रयत्न  करत असल्याचे  निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्व  संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.

0000

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

हिंगोली, दि.03: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत  जिल्ह्यातील  राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू-2 (महिला-1 पुरुष-1) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक -1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-1 यांच्या कार्याचे योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे याकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये  प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम  रु. 10 हजार देण्यात येणार असून पुरस्काराचे वर्ष 1 जुलै 2016 ते 30 जून 2017 असे राहील. याकरीता जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांनी दि. 4 ते 13 एप्रिल 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावेत.
गुणवंत खेळाडू पुरस्काराकरीता मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगत पुर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील वरीष्ठ/कनिष्ठ शालेय, ग्रामिण व महिला राष्ट्रीयस्तरीवरील कामगीरी लक्षात घेण्यात येईल यापैकी उत्कृष्ट ठरणा-या तिन वर्षाच्या कामगीरीचा विचार करण्यात येईल.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरीता सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूचीच कामगीर ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरीष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामिण व महिला (पंचायत युवा क्रीडा खेल व अभियान) मधील राष्ट्रीयस्तरावरील पदकविजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात.
तसेच गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्काराकरीता क्रीडा संघटक, कार्यकत्याने सतत दहा वर्ष महाराष्ट्र क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरीता त्या जिल्ह्यातील कामगीरी ग्राह्य धरली जाईल. क्रीडा कार्यकर्ते यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन पुढील तिन प्रकारे करण्यात येते. विकासात्मक कार्य - संघटक कार्यकर्ते यांच्या सक्रीय प्रयत्नातून अधिकृत खेळांची किती मैदाने त्यांच्या जिल्ह्यात उभारली गेली. किती व्यायाम शाळा, क्रीडा संस्था, संघटना स्थापन करण्यात आल्या. दहा वर्षात किती अधिकृत खेळाच्या राष्ट्रीय, राज्य, विभागिय, जिल्हास्तरीय भरविला व अर्जदाराची कोणती जबाबदारी होती ती स्पष्ट करावी.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे प्रस्ताव दि. 04 ते  13 एप्रिल 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत स्विकारले जाणार असून, दि. 13 एप्रिल 2018 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. यांची नोंद जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
00000

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
हिंगोली, दि.03: आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर विविध विषयांत युवांनी पार पाडलेल्या भुमिका योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय समूह अशी ओळख समाजात निर्माण झालेली आहे . युवा हा  समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या विकासासाठी  राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित  करण्यात येणार असून पुरस्कारासाठी पात्रतेचे स्वरुप,अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक , एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम  रु. 10 हजार (प्रति युवक व युवतींसाठी), प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम रु. 50 हजार अशा स्वरुपाचा असेल.
युवक युवतींसाठी पात्रतेचे निकषअर्जदार युवक युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षपर्यंत असावे, जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग  5 वर्ष वास्तव्य असणे आवश्य आहे, पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस पुरस्कार जिल्ह्यातून दिला जाणार, पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही, केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील (उदा. वृत्तपत्रकात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ. ),अर्जदार युवक युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे.
पात्रतेचे निकष – संस्था – पुरस्कार संस्थेस जिल्ह्यातून दिला जाणार , संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहिल. (उदा. वृत्तपत्रकात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.), अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे, अर्जदार संस्था विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी, अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान 5 वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे, अर्जदार    संस्थांचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा  क्रीडा अधिकारी  कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे .
000000