17 September, 2019




जिल्हाधिकारी कार्यालयात रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

        हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजु नंदकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी रोहयो अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र बागडे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार गजानन शिंदे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****


13 September, 2019

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सूट



       
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सूट
हिंगोली,दि.13 : सण, उत्सवात ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार दहा दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
            ध्वनीक्षेपकाचा वापर गणपती उत्सव 01 दिवस दिनांक 12 सप्टेंबर , नवरात्री उत्सव 02 दिवस 7 व 8 ऑक्टोबर , दिवाळी 01 दिवस दिनांक 27 ऑक्टोबर (लक्ष्मीपुजन) , ख्रिसमस 01 दिवस दिनांक 25 डिसेंबर , 31 डिसेंबर एक दिवस या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सुट  या जिल्ह्यापूरती राहील असे आदेशात म्हटले आहे.

*****



मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध


मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध

हिंगोली,दि.13:  महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात दि. 14 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2019  पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबार  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.  दिनांक 14,18,21,28 सप्टेंबर आणि 2,5,9,12,16,19,23,26, 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत या दिनांकांस पुढील अटी वर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे  परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही  व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस  स्टेशन हट्टा  यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
000000

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी


 जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी

हिंगोली, दि.13: शैक्षणिक सत्र 2019-20 मध्ये इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये इयत्ता 6 वी च्या प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. परीक्षा दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 01.30 आहे.
यावर्षी हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतीही फी राहणार नाही . पालक हे अर्ज कुठुनही अपलोड करु शकतात. त्याकरिता पुढील काही बाबी आवश्यक आहेत- विद्यार्थी व पालकाची सही, विद्यार्थ्यांचा फोटो (फोटोची साईज ही 10-100 के.बी. मध्ये) इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील सटीफिकेट, सदरहू सर्टीफिकेट हे विद्यालयाच्या वेबसाईट http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/hingoli/en/home & www.navodaya.gov.in वर डाऊनलोड लिंक मध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्याची अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2019 आहे.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी विस्तृत माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईट http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/hingoli/en/home & www.navodaya.gov.in वर उपलब्ध आहे. त्यासंबंधी अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. लक्ष्मणन यांनी केले आहे.
00000

09 September, 2019

बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक


बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक

हिंगोली, दि.9: बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 अंतर्गत कलम 41(1) अंतर्गत विधी संघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत व इच्छूक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी व शासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने राज्यातील स्वयंसेवी संस्थांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. ज्या स्वयंसेवी संस्थेनी दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीमध्ये  ऑनलाईन क्र. 714 ते 993 असे एकूण 280 संस्थेची अर्ज सादर केले होते. सदर प्रस्तावाची छाननी करण्यात आली असून प्रस्तावामध्ये आढळून आलेल्या त्रुटीची पुर्तता करुन घेणेबाबत व संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी अहवाल दिनांक 18 सप्टेंबर, 2019 पूर्वी महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य 28 राणीचा बाग, पुणे-1 येथे सादर करण्याबाबत कळविले आहे.
****



जनावरांच्या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिकरणचे प्रमाणपत्र आवश्यक


जनावरांच्या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिकरणचे प्रमाणपत्र आवश्यक


हिंगोली, दि.9: जनावरांची वाहतुक करण्यापूर्वी आपल्या वाहनांमध्ये केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 125 ई च्या तरतुदीनुसार वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन आपल्या वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घ्यावे.
The prevention of cruelty to Animals (Transport of Animals on Foot) Rules 2001 च्या नियम 96 च्या तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतुक करताना वाहतुकदाराने सक्षम प्राधिकरण तथा Animal Welfare Board of India यांनी तसेच केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी, व्यक्ती किंवा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. हे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांची वाहतुक करण्यास वाहतुकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.
            तसेच The Prevention of cruelty to Animals (Transport of Animals on Foot) Rules 2001 या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतुक करण्यात येऊ नये, उक्त तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कायदे नियमातील तरतुदीनुसार संबंधितांविरुध्द कायदेशीर करवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****


07 September, 2019




जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांना अभिवादन
           
        हिंगोली,दि.07: जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिनियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोवींद रणवीरकर, महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे, नायब तहसिलदार रघुनाथ मिटकरी, नायब तहसिलदार राज गळगे यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध  कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनी ही उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000