05 March, 2021

जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन

 


            हिंगोली, दि. 05 (जिमाका) : शासकीय, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, संस्था प्राधिकरण व त्यांच्या अखत्यारित असलेल्या सर्व संस्था व इतर कार्यालय (उदा. शाळा, विद्यालय, महाविद्यालये, आरोग्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा इ. ) मध्ये दि. 8 मार्च, 2021 रोजी जागतिक महिला दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ जगभरात 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांप्रती जिव्हाळा, आदर व्यक्त करण्याबरोबरच सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात दाद मिळावी यासाठी महिला दिन साजरा करण्याचा उद्देश आहे .

या महिला दिन कार्यक्रमास महिलांविषयी तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात यावे. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुढीलप्रमाणे घेण्यात यावी.  ‘‘मी घरात, कार्यालयात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात मुलांमुलींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मुली व महिलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्यास त्याचा विरोध करीन. मुली व महिलांच्या प्रतिष्ठेस हानी पोहचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही. त्यांच्या हक्कांचा व प्रतिष्ठेचा आदर ठेवीन.’’  

या कार्यक्रमात मुली व महिलांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने उदा. लिंगभेद संवेदनशिलता , कौंटुबिंक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, मुलींची  छेडछाड व कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध, मुलींचे घटते प्रमाण, हुंडा प्रतिबंध कायद्यासंदर्भात अंमलबजावणी या बाबीवर प्रबोधन करण्यात यावे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

****

04 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 44 रुग्ण ; तर 33 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  322 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 04 : जिल्ह्यात 44 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 25 व्यक्ती, वसमत परिसर 01, औंढा परिसर 09 व्यक्ती, सेनगांव परिसर 04 व्यक्ती, कळमनुरी परिसर 02 व्यक्ती असे एकूण 44 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 33 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 20 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 22 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 275 रुग्ण झाले असून, त्यापैकी  3 हजार 892 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 322 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 61 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

03 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 36 रुग्ण ; तर 20 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  311 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 03 : जिल्ह्यात 36 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 09, वसमत परिसर 04 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती, तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 16 व्यक्ती, औंढा परिसर 03 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती असे एकूण 36 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 20 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 18 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 20 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 231 रुग्ण झाले असून, त्यापैकी  3 हजार 859 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 311 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 61 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

 

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी

 


  हिंगोली, (जिमाका) दि. 03 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्हीड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 7  दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांचे व्यवस्थापक यांची असेल. सदरआदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

 

****

02 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 56 रुग्ण ; तर 10 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  296 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : जिल्ह्यात 56 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 20, वसमत परिसर 01 व्यक्ती, कळमनुरी परिसर 04 व्यक्ती, औंढा परिसर 02, सेनगांव परीसर 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 22 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती, सेनगाव परिसर 02 व्यक्ती, वसमत परिसर 02 व्यक्ती असे एकूण 56 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 10 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 15 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 17 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 195 रुग्ण झाले असून, त्यापैकी  3 हजार 839 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 296 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

01 March, 2021

कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी दराने वेतन देऊ नये सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : कामगार विभागाने सन 2020-21 मध्ये किमान वेतन अधिनियम-1948 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी  दिनांक 22 फेब्रुवारी, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत जनजागृती अभियान राबविण्याचे आदेश राज्य कामगार आयुक्तांनी दिले होते.

त्याअनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांच्यातर्फे दि. 26 फेब्रुवारी, 2021 रोजी एम.आय.डी.सी. लिंबाळा परिसरातील कारखाने, उद्योग, विटभट्टी उत्पादक उद्योग आणि इतर असंघटीत क्षेत्रात किमान वेतन अधिनियम-1948 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानात जिल्ह्यातील मालक वर्ग यांनी कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी दराने वेतन देण्यात येवू नये, असे सरकारी कामगार अधिकारी  टी. ई. कराड यांनी आवाहन केले .

या अभियानास येथील सरकारी कामगार अधिकारी  टी. ई. कराड , दुकाने निरीक्षक जी.एस.जडे, नितीन दवंडे, तसेच मालक व कामगार वर्ग उपस्थित होते.

*****

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 24 रुग्ण ; तर 25 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  250 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : जिल्ह्यात 24 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 05, वसमत परिसर 02 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 13 व्यक्ती, औंढा परिसर 02 व्यक्ती, सेनगाव परिसर 01 व्यक्ती असे एकूण 24 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 25 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 10 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 12 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 139 रुग्ण झाले असून, त्यापैकी  3 हजार 829 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 250 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****