13 February, 2022

 


रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी घेतला

मनरेगाच्या विविध कामाचा आढावा

वैयक्तीक सिंचन विहिरीची कामे दोन महिन्यात पूर्ण करावेत

                            - अपर मुख्य सचिव नंद कुमार

 

हिंगोली, (जिमाका) दि. 13 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील वैयक्तीक सिंचन विहिरीचे कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिले.

            येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक अपर मुख्य सचिव नंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना श्री. नंदकुमार म्हणाले, राज्यातील ज्या कुटुंबाला विहिरींची गरज आहे, अशा सर्व कुटुंबाला वैयक्तीक विहिरी टप्प्याटप्याने मंजूर करुन शंभर टक्के कुटुंबाला विहिरी मंजूर करावेत. या योजनेसाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपये वापरण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच कमी खर्चात जास्तीचे उत्पादन कसे घेता येईल यासाठी ठिबक सिंचन वापर कसा करता येईल, यावषियी माहिती सांगितली व विविध योजनेची माहिती प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना द्यावी. योजनेचे महत्व समजावून सांगावे. प्रत्येक कुटुंब लखपती झाला पाहिजे यासाठी काम करावेत, अशा सूचना केल्या.

तसेच कयाधू नदीचे पुनरजीवन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला पाणी म्हणजे काय याचे महत्व पटवून सांगावे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, मातीचा पोत सुधारण्याचे काम करणे गरजेचे आहे. यापासून आपला काय फायदा होणार आहे. यातून आपला आर्थिक विकास कसा साध्य होणार आहे, याची माहिती दिल्यास नदीचे पुनरजीवन करणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक गावचा विकास करावा. यासाठी प्रत्येक गावात जाऊन गावकऱ्यांशी चर्चा करुन मागणी नोंदवावी. तसेच पाणी, माती आणि आपणाकडे असलेल्या संसाधनाचा योग्य वापर करुन समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामी अधिकारी आणि स्वयंसेवी सस्थेंच्या प्रतिनिधीने समन्वयाने काम केल्यास आर्थिक मागासलेपण दूर होऊन जिल्ह्याचा, राज्याचा विकास करता येणार आहे, असेही श्री. नंद कुमार यांनी सांगितले.

            यावेळी मग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर कुशल निधी, सार्वजनिक व वैयक्तीक कामासाठी कुशल निधी, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीसाठी अर्धकुशल निधी, वैयक्तीक सिंचन विहीर, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर यासह शेततळे, जनावरांचा गोठा, शेळीपालन शेड यासह या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे यांनी मनरेगाच्या योजनांची सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ्‍ कसा घेता येईल. कयाधू नदीच्या पुनरजीवन कार्यक्रमातून प्रत्येक कुटुंबांचा विकास कसा साधता येईल, यासाठी काय केले पाहिजे याची माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव यांनीही मनोगत व्यक्त केले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

12 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 07 रुग्ण ; तर 120 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  483 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यात 07 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे वसमत परिसर 01 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे वसमत परिसर 05 व्यक्ती असे एकूण 07 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 120 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 423 रुग्ण झाले असून, त्यापैकी  18 हजार 538 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 483  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 402 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

11 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 37 रुग्ण ; तर 74 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  596 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : जिल्ह्यात 37 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 07 व्यक्ती, कळमनुरी परिसर 10 व्यक्ती, वसमत परिसर 05, औंढा ना. परिसर 09 व सेनगाव परिसर 06 व्यक्ती असे एकूण 37 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 74 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 416 रुग्ण झाले असून, त्यापैकी  18 हजार 418 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 596  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 402 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

10 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 59 रुग्ण ; तर 104 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  633 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 10 : जिल्ह्यात 59 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 06 व्यक्ती, कळमनुरी परिसर 10 व्यक्ती, वसमत परिसर 12, औंढा ना. परिसर 13 व सेनगाव परिसर 18 व्यक्ती असे एकूण 59 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 104 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 379 रुग्ण झाले असून, त्यापैकी  18 हजार 344 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 633  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 402 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

09 February, 2022

 


राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 09 : राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांच्या इमारती व माहिती भवन उभारुन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिक बळकटीकरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

माहिती जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाते. या महासंचालनालयाच्या अंतर्गत आठ विभागीय माहिती कार्यालये आहेत. परंतू बहुतांश माहिती कार्यालये भाड्याच्या जागेत असून अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे अशा सर्व अधिनस्त माहिती कार्यालयासाठी स्वत:ची जागा मिळवून, कार्यालयाची इमारत बांधकाम, बळकटीकरण, पायाभूत सुविधा निर्मिती करण्यासाठी  विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, माहिती भवन इमारत बांधकाम योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती  शासकीय जमिन प्राप्त करुन घेण्यात येईल.

****

 जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 33 रुग्ण ; तर 269 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  678 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 09 : जिल्ह्यात 33 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे वसमत परिसर 01 व्यक्ती, औंढा ना. परिसर 05 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 10 व्यक्ती, कळमनुरी परिसर 09 व्यक्ती, वसमत परिसर 03 व सेनगाव परिसर 05 व्यक्ती असे एकूण 33 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 269 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 320 रुग्ण झाले असून, त्यापैकी  18 हजार 240 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 678  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 402 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 

मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 09 : प्रमोद महाजन कौशल्य  विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2021-22 या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थी हँड एम्ब्रॉयडर, एडिटर, रिटेल सेल्स असोसिएट, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ड्रायिंग, डिहायड्रेशन टेक्नीशियन, जॅम, जेली अँड केचप प्रोसेसिंग टेक्नीशियन, पिकल मेकींग टेक्नीशियन, इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोल्युशन्स, लाईनमेन डिस्ट्रीब्यूशन, फिटर-मेकॅनिकल ॲसेम्ब्ली, आयटी  को-ऑर्डीनेटर इन स्कूल, सोलार पॅनेल इंस्टॉलेशन टेक्निशियन, असिस्टंट सर्वेअर, डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर, सीआरएम डोमेस्टीक नॉन व्हाईस, इन्व्हेंटरी क्लर्क, कुरीअर डिलेव्हरी एक्झ‍िक्युटीव्ह या एकूण 16 कोसेर्समध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात.

            इच्छूक लाभार्थ्यांनी दि. 16 फेब्रुवारी, 2022 पूर्वी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगारक्षम बनावे, असे आवाहन डॉ. रा.म.कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

*****