21 April, 2017

ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडेदराचे अभिप्राय ऑनलाईन करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडे सुत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन ऑटोरिक्षा / टॅक्सी संघटनाचे मते व ग्राहक प्रतिनिधी यांची मते आजमवली आहेत. यादरम्यान विविध मुद्दावर संबंधितामध्ये दिलेल्या मतांमध्ये मत भिन्नता असल्याने समितीने व्यापक प्रमाणावर ऑटोरिक्षा / टॅक्सी व्यवसायिकांना त्यांच्या संघटनाना तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडता यावीत याकरीता समितीने संगणकीय सर्व्हे घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अध्यक्ष यांनी निर्देश दिले आहेत की विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑटोरिक्षा / टॅक्सी सर्व्हे नमुने ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले आहे.
ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडेदर सुत्र समितीचे महाराष्ट्रातील जनतेचा अभिप्राय, ऑटोरिक्षा चालक अभिप्राय, टॅक्सी चालक अभिप्राय, ऑटोरिक्षा / टॅक्सी संघटनांचा अभिप्राय हे नमुने सर्व्हेक्षण करण्यास्तव वेबसाईटवर Maji Menu - सूचना - फिडबॅक फॉर्म यानुसार मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड केले आहेत. तरी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी, ग्राहक प्रतिनिधी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, चालक व संघटनांनी रविवार दि. 30 एप्रिल 2017 पर्यंत आपले अभिप्राय परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदवावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी केले आहे.

*****
कुष्ठरुग्णांचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेत मागील तीन वर्षापासून कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांचेकडून राज्य आरोग्य अभियान अंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एनजीओ स्कीम अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग हिंगोली जुना सरकारी दवाखाना (तोफखाना), हिंगोली 431513, (दूरध्वनी क्र. : 02456-221243) या कार्यालयाशी संपर्क साधून प्रस्ताव दि. 25 एप्रिल, 2017 रोजीपर्यंत सादर करावे, असे आवाहन आरोग्य सेवा कुष्ठरोग चे सहाय्यक संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  
अधिकारी / कर्मचारी यांनी कर्तव्य जबाबदाऱ्या ओळखून कर्तव्य पार पाडावीत
                                                --- निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड
हिंगोली,दि. 20: - प्रत्येक विभागाच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांनी आपआपली कर्तव्य जबाबदाऱ्या
ओळखून कर्तव्य पार पाडावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी केले.  
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नागरी सेवा दिन-2017 साजरा करण्यात आला त्यानिमित्त झालेल्या सोहळ्यात निवासीउपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता                      श्री. देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पारवेकर , नायब तहसीलदार रघुनाथ मिटकरी, श्री. सुनिल कावरखे, ॲड. अरगडे आदि  विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. 
 नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा देऊन ॲड. अरगडे म्हणाले की , अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर अधिक लोकाभिमुखपणे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला मिळालेला अधिकार हा जनतेच्या सेवेकरिता आहे. त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचविणे आपले कर्तव्य आहे, ही भावना प्रत्येकात रुजली पाहिजे. प्रशासनाविषयी जनतेत आदर असायला पाहिजे. लोकाभिमुख प्रशासनासह ते पारदर्शकदेखील असणे आवश्यक आहे. जनतेसाठीच प्रशासन असल्याने पारदर्शकतेला महत्त्व आहे, आपली जिथे नियुक्ती केली तिथे त्यांनी चांगले काम करुन दाखविले पाहिजे, असे आवाहनही ॲड. अरगडे केले.
            नायब तहसीलदार रघुनाथ मिटकरी यांनी सुत्रसंचालन प्रास्ताविक केले.
नागरी सेवा दिन-2017 शासनाचे सत्कारमूर्ती अधिकारी / कर्मचारी : विशेष अधिकारी समाज कल्याण श्रीमती जी. डी. गुठ्ठे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वसमत डी.एस. देवतराज, शाखा अभियंता डी. आर. धाडवे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी कार्यालयाचे सांख्यिकी सहाय्यक ओमप्रकाश टिक्कस, नायब तहसील राजेंद्र गळगे, सुनिल कावरखे, शासकीय तंत्र निकेतन हिंगोलीचे अधिव्याख्याता यंत्र ए. आर. लोळगे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्पनिर्देशक एस. एम. राका आदि अधिकारी / कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले .

**** 

19 April, 2017

एमआयएस अधिकारी पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.19: महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे एमआयएस अधिकारी कंसल्टंट तत्वावर नेमणे आहे. एमआयएस अधिकारी नियुक्तीसाठी शैक्षणिक पात्रता बीएसएसी आयटी/ कॉम्प्युटर्स/स्टॅटीस्टीक्स अथवा बीई आयटी कॉम्प्युटर्स/स्टॅटीस्टीक्स असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. 24 एप्रिल, 2017 असून पात्र उमेदवारांनी www.mavimindia.org या संकेतस्थळावर होम पेजवर क्लिक करून MAVIM Recruitment/2017 या लिंकवर अर्ज नमुन्यासाठी Application Form वर क्लिक करा व अर्ज जिल्हा कार्यालय, एमआयडीसी एरिया, लिंबाळा मक्ता, येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
जालना येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि.19: जिल्ह्यातील सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दि. 27 एप्रिल, 2017 ते दि. 07 मे, 2017 या कालावधीत सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर (टेक्निकल), सोल्जर क्लर्क/स्टोर किपर व सोल्जर ट्रेडमॅन या पदासाठी जालना येथे भरती घेण्यात येणार आहे.
सदर भरतीस जास्तीत-जास्त उमेदवारांनी हजर राहावे, अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
स्कुल बस सुरक्षेसाठी वेबसाईट
हिंगोली, दि.19: जिल्ह्यातील सर्व शाळांमधून परिवहन समित्या स्थापन करून त्याची माहिती वेबसाईटवर भरण्यात यावी. वेळोवेळी शासनास माहिती पाठविणे सोपे व्हावे व तसेच शाळा, शिक्षण विभाग व  परिवहन विभाग यामध्ये समन्वय राहावा व माहिती लवकर प्राप्त व्हावी यासाठी वेबसाईट (संकेतस्थळ) schoolbussafetyhingoli.org तयार करण्यात आली आहे. सदर वेबसाईट सर्वसामान्य नागरिक व जिल्ह्यातील सर्व शाळांना पाहता येईल. वेबसाईटवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन करून समिती स्थापन करण्याबाबत माहिती भरण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी आवाहन केले.
येथील जिल्हा परिषद, सभागृहात जिल्हा स्कुल बस समितीच्या बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी बैठकीस पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. चवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. पवार, उपशिक्षणाधिकारी श्री. इंगोले, एस. टी. महामंडळचे श्री. पाटील व नगर पालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती.
पोलीस अधिक्षक अशोक मोराळे यांनी शाळांच्या अडचणी विचारुन घेतल्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कमीटीतील प्रत्येक घटकाने काम केले पाहीजे. तसेच शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापन करून त्या मार्फत विद्यार्थी सुरक्षेबाबतच्या बाबीसाठी प्रयत्न केले पाहीजे. पालकामध्ये तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकामध्ये विद्यार्थी सुरक्षेबाबत जागृती निर्माण केली पाहीजे याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षक, पालक, वाहनचालक, प्रशासन या सर्व घटकांनी मिळून विद्यार्थी सुरक्षेसाठी प्रयत्न केले पाहीजे असे आवाहन श्री. मोराळे यांनी केले.
वेबसाईटमध्ये माहिती कशी भरावी याबाबत मोटार वाहन निरीक्षक अशोक जाधव यांनी मार्गदर्शन केले.  प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी देखील मुख्याध्यापकांना जून 2017 पर्यंत वेबसाईटवर माहिती भरण्याबाबत सुचना केल्यात तसेच त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

*****

15 April, 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न
            हिंगोली, दि. 15 : सामाजिक  न्याय    विशेष  सहाय्य  विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती  वर्षा  निमीत्त दिनां दि. 08 ते 14 एप्रिल, 2017 या कालावधीत  शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला होता.
            यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 14 एप्रिल हा दिवस प्रतिवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून त्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत व्हावी या उद्देशाने कु. राणी संतोष जोगदंड, इयत्ता 9 वी मधील ही मुलगी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक विजेतेपद मिळाल्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तीचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर आधारित संपुर्ण विद्यार्थ्यांकडून मौन वाचन करून ज्ञान दिवसाचे उद्दिष्ठ सफल होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी (शा.नि.शा.) श्रीमती जी. डी. गुठ्ठे यांनी केले. यावेळी अध्यक्ष म्हणून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्रीमती डॉ. सी. के. कुलाल तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी प्राचार्य विक्रम जावळे व प्रा. सुखदेव बलखंडे, आर्थिकदृष्टया मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती एस. आर. राठोड, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल गजानन बिहाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थोर महापुरुषांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच प्रमुख पाहुणे प्राचार्य विक्रम जावळे यांनी अर्थशास्त्र व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर प्रा. सुखदेव बलखंडे यांनी समाजशास्त्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयातील सर्व शासकीय वसतिगृहामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवहार आढळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजीत भराडे यांनी केले. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थी, एस. जी. चव्हाण, एस. आर. वडकुते, ए. डी. बिजले, आर. एन. गायकवाड व सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

*****