04 October, 2024
शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग,उडीद,सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा •जिल्ह्यातील नऊ खरेदी केंद्रांचा समावेश
हिंगोली (जिमाका), दि. 04 : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने 2024-25 या हंगामामध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबर, 2024 पासून नोंदणी सुरु झाली आहे. प्रत्यक्षात मूग, उडीद खरेदी दि. 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी दि. 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ९ खरेदी केंद्रांचा समावेश आहे.
राज्य शासनाने राज्यात 209 खरेदी केंद्रांना मंजूर दिली असून त्यांच्यामार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत मूग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही केंद्रीय नोडल एजन्सींना खरेदीकरिता जिल्ह्यांची विभागणी करुन दिलेली आहे. नाफेड कार्यालयाने 19 जिल्ह्यातील 146 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये अकोला-9, अमरावती 8, बीड-16, बुलढाणा-12, धाराशीव-15, धुळे-5, जळगाव-14, जालना-11, कोल्हापूर-01, लातूर-14, नागपूर-8, नंदूरबार-2, पुणे-01, सांगली-2, सातारा-01, वर्धा-8, वाशिम-5, यवतमाळ-7 आणि परभणी जिल्ह्यातील 8 खरेदी केंद्राचा समावेश आहे.
एनसीसीएफ कार्यालयाने 7 जिल्ह्यातील 63 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 6, अहमदनगर-7, सोलापूर-11, छत्रपती संभाजीनगर-11, हिंगोली-9, चंद्रपूर-5 आणि नांदेड-14 खरेदीकेंद्राचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कयाधू शेतकरी उत्पादक कंपनी मर्या. तोंडापूर (खरेदी केंद्र वारंगा फाटा), हजरत नासरजंग बाबा स्वयंसेवा सहकारी संस्था मर्या. (खरेदी केंद्र येहळेगाव), प्रगती स्वंय सेवा सहकारी संस्था मर्या. हिंगोली (खरेदी केंद्र बळसोंड हिंगोली), औंढा नागनाथ तालुका खरेदी विक्री सह. संघ (खरेदी केंद्र जवळा बाजार), कयाधू शेतकरी उत्पादक कंपनी मर्या. तोंडापूर (खरेदी केंद्र कळमनुरी), श्री संत नामदेव स्वयं. सेवा सहकारी संस्था मर्या. चोरजवळा (खरेदी केंद्र कन्हेरगाव), विजयालक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था मर्या. कोळसा (खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव), श्री. संत भगवान बाबा स्वयं सेवा सहकारी संस्था मर्या. कोथळज (खरेदी केंद्र सेनगाव), वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. वसमत (खरेदी केंद्र वसमत) या केंद्राचा समावेश आहे.
सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलैल्या आधारभूत दरामुनसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता राबविण्यात येत आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मूग, उडीद व सोयाबीन विक्रीकरिता आपल्या गावाजवळील नाफेड, एनसीसीएफच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबूक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करावी. आपणास एसएमएस प्राप्त झाल्यावर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment