10 January, 2023

 

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मोटार सायकल वाहन रॅलीचे 11 जानेवारी रोजी उद्घाटन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 10 :  रस्ता सुरक्षा सप्ताह-2023 च्या निमित्ताने मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत दि. 11 जानेवारी, 2023 ते 17 जानेवारी, 2023 या कालावधीत आरोग्य शिबीराचे आयोजन, नेत्र तपासणी, वाहनचालकामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करणे, माहितीपत्रकाचे वाटप करणे, शाळा व कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करणे, विविध गुन्ह्याअंतर्गत विशेष मोहिम राबविणे इत्यादी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            या रस्ता सुरक्षा सप्ताह-2023 चे उद्घाटन दि. 11 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस कवायत मैदान, हिंगोली येथून मोटार सायकल (हेल्मेट रॅली) रॅलीद्वारे करण्यात येणार आहे. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, एसआरपीएफचे समादेशक श्रीमती पोर्णिमा गायकवाड, अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक अर्चना गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत.

            या उद्घाटन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मोटार सायकल वाहन चालकांनी  रॅलीमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.  

****

No comments: