02 January, 2023

 

आशा डे निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशांचा सत्कार

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने आशांचा सन्मान


 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांच्या पुढाकारांने आशा डे निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील आशा कार्यकर्तींचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

आज येथील माजी खा.स्व.शिवाजीराव देशमुख सभागृहात हिंगोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने आशा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार,  जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सचिन भायेकर, सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, युवती सक्षमीकरण प्रशिक्षक रत्नाकर महाजन, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, पं.स.चे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, महिला बाल विकास अधिकारी राजेश मगर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळकृष्ण लांजेवार, ॲड. सुकेशनी ढवळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा समुह संघटक अजहर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, ॲड.सुकेशनी ढवळे, रत्नाकर महाजन यांनी महिला सक्षमीकरण व इतर विषयावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी उपस्थित आशा कार्यकर्तींना आशा डे निमित्त शुभेच्छा देऊन जिल्ह्याने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी राज्य पातळीवर केलेली आहे. यामुळे जिल्हयाचा नावलौकिक वाढत आहे. कोविड काळामध्ये आशा कार्यकर्तींसह आरोग्य विभागाचे महत्वपुर्ण योगदान आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते धनवंतरी पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशा कार्यकर्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार भगीरथी शिवाजी शिखरे, द्वितीय प्रणाली प्रल्हाद खिल्लारे, संघमित्रा जगनाथ खंदारे (प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सी) प्रथम पुरस्कार, संगिता मसाजी गायकवाड (प्रा.आ.केंद्र भांडेगाव प्रथम पुरस्कार), ज्योती विजय गरपाळ (प्रा.आरोग्य केंद्र फाळेगाव प्रथम पुरस्कार), रिना प्रल्हाद दाभाडे हिंगोली शहर प्रथम पुरस्कार, सुनिता सुभाष गायकवाड हिंगोली शहर प्रथम पुरस्कार, सविता रामप्रसाद जाधव (प्रा.आ.केंद्र सिरसम प्रथम पुरस्कार) या आशा कार्यकर्तींचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंदना सोवितकर यांनी केले. यावेळी आशा डे निमित्त गितांचे सादरीकरण राजु लोखंडे, कांबळे, खिल्लारे व त्यांच्या संचाने सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांना स्क्रिनद्वारे महिला सक्षमीकरणावर सांगोपांग मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, डॉ.दिपाली पतंगे, डॉ.अझहर देशमुख, डॉ.वैशाली मुळे, डॉ.श्रीमती गुठ्ठे, डॉ.जगताप, डॉ.समरिन, डॉ.टारफे, डॉ.कर्‍हाळे, डॉ.चाटसे,  प्रकाश बर्वे, रविंद्र भालेराव, शैलेश मुंदडा, हर्षवर्धन मनवर, शेख अन्वर, मारोती सोलापुरे, पंजाब गायकवाड, प्रदिप आंधळे, गणेश ठोके, शेख नसरीन, स्वाती जगताप, दिपीका देशमुख, अनिता घोगंडे, वंदना मोरे, जयश्री इंगोले, मंदा भिसे, कावेरी चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला आशा कार्यकर्तीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

 

No comments: