23 January, 2023

 

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत

2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल

 



 

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार  सर्व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 23 जानेवारी, 2023 रोजी जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे शहरातील महावितरण कार्यालय (MSEB), राज्य परिवहन कार्यालय व परिसर आदी ठिकाणी व शासकीय कार्यालय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर व शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असतांना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार शासकीय कार्यालय कर्तव्यावर असतांना, सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन व विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे शहरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या सहकार्याने पोलीस डिटेक्शन ब्रँचचे नरेंद्र साळवे, मराठवाडा ग्रामीण संस्था, औरंगाबादचे अभिजित संघई व जिल्हा रुग्णालयातर्फे आनंद साळवे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने  केली. या कार्यवाहीत एकूण 11 लोकांकडून 02 हजार 200 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

****

No comments: