05 January, 2023

 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

हिंगोली जिल्ह्यात 12 मतदान केंद्रावर 3060 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

  •  प्रत्येक तालुक्याला एक झोन, 02 भरारी, 02 व्हिडिओग्राफी, 02 व्हिडिओ पाहणी पथकाची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारत निवडणूक आयोगाने दि. 29 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

             गुरुवार, दि. 5 जानेवारी, 2023 रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 12 जानेवारी, 2023 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार,दि. 13 जानेवारी, 2023 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. सोमवार, दि. 16 जानेवारी, 2023 रोजी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा अंतिम दिवस. सोमवार, दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 पर्यंत मतदान होणार आहे. गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच शनिवार, दि. 4 फेब्रुवारी, 2023 पूर्वी निवडणूक पूर्ण होईल.

            औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे हिंगोली जिल्ह्यात 12 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात पुरुष मतदार 2580 व स्त्री मतदार 480 असे एकूण 3060 मतदार आहेत. मतदान केंद्रनिहाय मतदाराचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            83-तहसील कार्यालय, हिंगोली या मतदान केंद्रास 1) हिंगोली भाग क्र. 154, 2) खांबाळा भाग क्र. 155, 3) नर्सी (ना) भाग क्र. 159, 4) डिग्रस (क) भाग क्र. 160 हे भाग जोडलेले असून  या मतदान केंद्रावर 525 मतदार मतदान करणार आहेत. 84- जिल्हा परिषद प्रशाला बासंबा ता.जि.हिंगोली या मतदान केंद्रास 1) माळहिवरा भाग क्र. 156, 2) सिरसम भाग क्र. 157, 3) बासंबा (बु.) भाग क्र. 158 हे भाग जोडलेले असून  या मतदान केंद्रावर 198 मतदार मतदान करणार आहेत.      85-तहसील कार्यालय कळमनुरी जि.हिंगोली या मतदान केंद्रास 1) कळमनुरी भाग क्र. 161, 2) नांदापूर भाग क्र. 162 हे भाग जोडलेले असून  या मतदान केंद्रावर 262 मतदार मतदान करणार आहेत. 86- जि.प. प्रशाला, आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली या मतदान केंद्रास आखाडा बाळापूर भाग क्र. 163, 2) वाकोडी भाग क्र. 166 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 193 मतदार मतदान करणार आहेत. 87- जि.प. प्रशाला, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली या मतदान केंद्रास 1) डोंगरकडा भाग क्र. 164, 2) वारंगा फाटा भाग क्र. 165 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 183 मतदार मतदान करणार आहेत. 88- जि.प. प्रशाला, सेनगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली या मतदान केंद्रास 1) सेनगाव भाग क्र. 167, 2) साखरा भाग क्र. 170, 3) हत्ता भाग क्र. 172 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 244 मतदार मतदान करणार आहेत. 89- जि.प. प्रशाला,आजेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली या मतदान केंद्रास 1) गोरेगाव भाग क्र. 168, 2) अजेगाव भाग क्र. 169, 3) पानकन्हेरगाव भाग क्र. 171 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 221 मतदार मतदान करणार आहेत. 90- तहसील कार्यालय, वसमत, जि. हिंगोली या मतदान केंद्रास 1) वसमत भाग क्र. 173, 2) हयातनगर भाग क्र. 179 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 537 मतदार मतदान करणार आहेत. 91- जि.प्र. प्रशाला, हट्टा,            ता. वसमत, जि. हिंगोली या मतदान केंद्रास 1) हट्टा भाग क्र. 174, 2) टेंभुर्णी भाग क्र. 177 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 129 मतदार मतदान करणार आहेत. 92- जि.प. प्रशाला, कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली या मतदान केंद्रास            1) गिरगाव भाग क्र. 175, 2) कुरुंदा भाग क्र. 176, 3) अंबा, भाग क्र. 178 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 190 मतदार मतदान करणार आहेत. 93- तहसील कार्यालय, औंढा (ना.), जि. हिंगोली या मतदान केंद्रास 1)औंढा ना. भाग क्र. 180, 2) येहळेगाव सोळंके भाग क्र.182, 3) साळणा भाग क्र. 183 हे भाग जोडलेले असून या मतदान केंद्रावर 240 मतदार मतदान करणार आहेत. 94- जि.प. प्रशाला, जवळा बाजार ता. औंढा (ना.), जि. हिंगोली  या मतदान केंद्रास जवळा बाजार भाग क्र. 181 हा भाग जोडलेला असून या मतदान केंद्रावर 138 मतदार मतदान करणार आहेत.

या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्याचा एक याप्रमाणे पाच झोन तयार करण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, औंढा ना. व सेनगाव तालुक्याला प्रत्येकी  02 भरारी पथक (FS), 02 व्हिडीओग्राफी पथक (VST) आणि 02 व्हिडीओ पाहणी पथक (VVT) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

ही निवडणूक मतपत्रिकेव्दारे (Ballot Paper) होणार असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रासाठी  03  याप्रमाणे 36 व राखीव 14 अशा 50 लोखंडी  जंबो मतपेट्या वापरण्यात येणार आहेत .  आवश्यक इतक्या मतपेट्या उपलब्ध आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 5 क्षेत्रीय अधिकारी, 05 रुट गाईड, 17 सुक्ष्म निरीक्षक, 17 मतदान केंद्राध्यक्ष, 51 मतदान अधिकारी आणि तसेच आवश्यक इतक्या इतर अधिकारी/  कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

            निवडणूकीच्या संचालनासाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष, निवडणूक संचालन कक्ष, मतपत्रिका तपासणी कक्ष, मतदान साहित्य वितरण व स्वीकृती कक्ष, मतदान केंद्रावरील मुलभूत सोयीसुविधा कक्ष, प्रशिक्षण कक्ष, वाहन परवाना व इतर परवानगी कक्ष, आय.टी. व पोल डे मॉनिटरींग/ रिपोटींग कक्ष, मिडिया कक्ष, मदत व तक्रार निवारण कक्ष इत्यादी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती  दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

*****

No comments: