23 January, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी




 

हिंगोली (जिमाका), दि. 23 :  नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, रंजना कोठूळे  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: