12 January, 2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी



 

हिंगोली (जिमाका), दि. 12 :  राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  माहिती सहायक चंद्रकांत कारभारी  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***** 

No comments: