05 January, 2023

 

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी

निवड चाचणी परीक्षेसाठी 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्ह्यातील वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालय हे शिक्षा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या संपूर्णत: निवासी स्वरुपाचे विद्यालय आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता  5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 6 वी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयात निवड चाचणी परीक्षा प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ही निवड चाचणी परीक्षा ही शनिवार, दि. 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 दरम्यान होणार आहे.

            यावर्षी हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क राहणार नाही. पालक हे अर्ज कोठूनही अपलोड करु शकतात.

            त्यासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड, विद्यार्थी व पालकाची सही (स्कॅन), विद्यार्थ्याचा फोटो जेपीजी फॉरमॅटमध्ये (साईज 10 ते 100 के.बी.), इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील सर्टीफिकेट (स्कॅन कॉपी) आवश्यक आहेत. सदर सर्टीफिकेटचा नमुना विद्यालयाच्या http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Hingoli/en/home & www.navodaya.gov.in या वेबसाईटवर डॉऊनलोड लिंकमध्ये उपलब्ध आहे. तसेच याच वेबसाईटवरुन विद्यार्थी दिलेल्या लिंकद्वारे प्रवेश अर्ज करतील. अर्ज अपलोड करण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2023 हा आहे.

            प्रवेश अर्ज भरण्यासाठी विस्तृत माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Hingoli/en/home & www.navodaya.gov.in  या वेबसाईटवर उपलब आहे. मुख्याध्यापकांनी इच्छुक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज तात्काळ भरावे. अर्ज भरण्यास काही अडचण निर्माण होत असल्यास विद्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन एस.एस.वाघमारे, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

*****

No comments: