02 January, 2023

 

किडनी वाचवा आणि डायलेसीस थांबवा अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : आजच्या तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धुम्रपान, मद्यपान, तंबाखू, गुटखा व मेडिकलमधून डॉक्टरच्या सल्याशिवाय पेनकिलर औषधी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे व खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे किडनी खराब व निकामी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे समाजामध्ये किडनी आजाराविषयी व डायलेसीसबाबत माहिती जनतेला व्हावी म्हणून येथील जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस विभागामार्फत किडनी वाचवा आणि डायलेसीस थांबवा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जनजागृतीसाठी किडनी विषयी प्राथमिक माहिती, रचना, कार्य व उपचार पध्दती, किडनी फेल होण्याची कारणे आणि डायलेसीस प्रतिबंध कसे करावे या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे.

या निबंध स्पर्धेसाठी 500 ते 1000 हजार शब्द मर्यादा आहे. प्रत्येक महाविद्यालय, शाळा यांनी ही स्पर्धा त्यांच्यास्तरावर आयोजित करुन सर्वोत्कृष्ट 05 निबंध (गुणानुक्रमे 1,2,3,4,5) निवडून डायलेसीस विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली  येथे दि. 15 जानेवारी, 2023 पर्यंत जमा करावेत. अधिक माहितीसाठी डायलेसीस विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.टी.एस.आऊलवार (मो. 8080316559) यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त निबंधामधून सवोत्कृष्ट 03 निबंधाची निवड करुन पारितोषिक देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी व कै. पंडित गुरुजी यांच्या स्मरणार्थ       श्री. गजानन शिंदे यांच्यातर्फे प्रथम बक्षीस 2101/- रुपये व शासकीय प्रमाणपत्र, द्वितीय बक्षीय 1101 रुपये व शासकीय प्रमाणपत्र, तृतीय बक्षीस 501 रुपये रोख व शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांनी कळविले आहे.

 *****

No comments: