20 January, 2023

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 23 ते 25 जानेवारी या कालावधीत

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत दि. 23 जानेवारी ते दि. 25 जानेवारी, 2023  या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  

या रोजगार मेळाव्यात टाटा मनसा मोटर्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, गोविंदराज ट्रेडर्स हिंगोली येथील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी या शैक्षणिक आर्हतेनुसार 50 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इच्छूक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****  

No comments: