24 January, 2023

 

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे

26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

 

        हिंगोली (जिमाका), दि. 24 :  शासकीय जिल्हा रुग्णालय हिंगोली डायलेसिस विभागातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. तुकाराम आऊलवार यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी वाचवा आणि डायलेसिस थांबवा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले आहे. यामध्ये हिंगोली येथील श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थनिी कु. मिताली मिलींद पाठक हिला प्रथम, कळमनुरी येथील कै.शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.शुभांगी सुधाकर पतंगे यांना द्वितीय तर हिंगोली येथील सत्यनारायण विद्यालयाची श्रीमती शुभांगी जगदेव नाईक यांना जाहीर झाला आहे. या निबंध स्पर्धेत सर्व प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या स्पर्धकांना दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात हिंगोली येथे मान्यवराच्या हस्ते अनुक्रमे 2101 रुपये, 1101 रुपये, 501 रुपये तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डायलेसीस विभागाने दिली आहे.    

****

No comments: