06 January, 2023

 

विविध कारणामुळे सेवा समाप्त केलेल्या होमगार्डनी

संघटनेत सामावून घेण्यासाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 :  महासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये 01 जानेवारी, 2010 ते 17 जुलै, 2015 या कालावधीत विविध कारणामुळे सेवा समाप्त केलेल्या होमगार्डना संघटनेत सामावून घेण्याबाबत जिल्हा समादेशक होमगार्ड  कार्यालयास कळविले आहे.

        त्यामुळे वरील कालावधीत कमी करण्यात आलेल्या होमगार्डंनी आपले विनंती अर्ज समादेशक अधिकारी यांच्यामार्फत दि. 15 जानेवारी, 2023 पर्यंत सादर करावेत. यानंतर आलेल्या विनंती अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. ही बातमी हिंगोली  जिल्ह्यापुरती मर्यादित असल्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारानी अर्ज सादर करु नयेत, अशी माहिती जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी दिलेली आहे.

सेवा समाप्त केलेल्या होमगार्डनी  विनंती अजी सोबत प्रपत्र अ नुसार स्वःचा विनंती अर्ज सादर करावा. प्रपत्र ब नुसार कुठल्याही संघटनेचा सदस्य नाही व होणार नाही  तसेच आंदोलन, मोर्चे, उपोषण इत्यादित भाग घेणार नाही. बेशिस्त वर्तन करणार नाही. जिल्हा शल्यचिकित्सक हिंगोली यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. प्रपत्र अ व ब समादेशक अधिकारी होमगार्ड पथक हिंगोली, वसमत व कळमनुरी या कार्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

******

No comments: