16 January, 2023

 

औंढा नागनाथ येथे नेहरु युवा केंद्राच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

क्रीडा स्पर्धामध्ये युवक-युवतींचा प्रचंड उत्साह



 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्र हिंगोली आणि वाटसरु फाउंडेशन हिंगोलीच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा स्पर्धा 15 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी बक्षीस वितरण कार्यक्रम व समारोपीय सोहळ्याने संपन्न झाल्या.

औंढा नागनाथ येथील तालुका क्रीडा संकुलात या स्पर्धांचा शुभारंभ पार पाडला.युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख उपस्थित क्रीडा मार्गदर्शक विजय जाधव, राष्ट्रीय खेळाडू गजानन आडे, एनआयएस कोच व क्रीडा शिक्षक कल्याण पोले व कबड्डी कोच गजानन राठोड होते.

नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुका क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात प्रविण पांडे यांनी नेहरु युवा केंद्र हे युवक-युवती व राष्ट्र कल्याणाचे कार्य करीत असून अनेक योजना राबवत असल्याने त्याचा लाभ  घ्यावा, असे आवाहन केले. 15 ते 19 वर्ष वयोमर्यादा असलेल्या  युवकांनी 100 मीटर व 1600 मीटर धावणे, गोलाफेक, कब्बडी तसेच युवतींनी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोला फेक स्पर्धेत सहभागी होवून खेळाडू वृतीचे प्रदर्शनही केलं. राष्ट्रीय खेळाडू व कोच एकता स्पोर्टस् अकॅडमीचे प्रमुख गजानन आडे, कब्बडीचे कोच व पंच कल्याण पोले, गजानन राठोड यांच्या माध्यमातून परीक्षण समितीने दिलेल्या निर्णयानुसार विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र, ट्रॉफी देवून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. उदघाटन आणि बक्षीस वितरण समारंभाचे संचालन नेहरु युवा केंद्राचे हिंगोली तालुका युवा समन्वयक प्रवीण पांडे यांनी केले. नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, युवा  समन्वयक नामदेव फरकंडे, कृष्णा पखवाने, सुदर्शन राठोड, शंकर दिवटे सर्व संबंधितानी परिश्रम घेतले.

नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात क्रीडा स्पर्धा उत्तम पद्धतीने पार पाडल्या. विजयी झालेल्या स्पर्धकाची जिल्हा पातळीवर निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा लवकरात लवकर आयोजित केल्या जाणार असून त्याचा  लाभ युवक युवतींनी घ्यावा, असे आशिष पंत यांनी सांगितले. कबड्डी  या सांघिक खेळामध्ये प्रथम क्रमांक काठोडा तांडा कबड्डी संघ, द्वितीय क्रमांक केळी तांडा कबड्डी संघ, तर तृतीय क्रमांक पिंप्री कबड्डी संघ ठरला आहे. या विजेत्या संघाला ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

****

No comments: