07 April, 2025
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 07 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून साठी प्रवेश पात्रता परीक्षा दि. 1 जून, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी दि. 31 मार्च, 2025 पर्यंत आवेदनपत्र मागविण्यात आले होते. परंतु या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या कमी असल्यामुळे डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजचे कमांडंट यांनी या परीक्षेचे आवेदन पत्र स्वीकारण्याचा कालावधी दि. 15 एप्रिल, 2025 पर्यंत वाढविला आहे, अशी माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दिली आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment