13 April, 2025
सामाजिक सप्ताहानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह अंतर्गत मौजे जवळा पळशी येथे आज ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबीर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्नपूर्णा महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब इंगोले, मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे, श्रीमती मीनाक्षी बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास नितीन राठोड, मोतीराम फड, नागनाथ नकाते, नितीन खरात, बाळू नागरे, आकाश सोनटक्के, चंदू लाखाडे, दत्ता कुंभार, नरेश पोळकर, राजू चरण, श्रावण खरोडे आदी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 200 ते 300 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment