01 April, 2025

मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्रीमती अंजली रमेश रुजू

हिंगोली, दि. 01 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागप्रमुख उपस्थित होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीमती अंजली रमेश या मध्य प्रदेश संवर्गातील असून, त्यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. अंजली रमेश यांनी अहमदाबाद येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर त्यांनी आयआयटी चेन्नई (मद्रास) येथून बीटेक आणि एमटेक पूर्ण केले आहे. यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशमध्ये उपविभागीय अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहीले आहे. *****

No comments: