11 April, 2025
क्रीडा गुणांसाठी 17 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 11 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोलीच्या वतीने इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीच्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. यासाठीचे ऑनलाईन प्रस्ताव 15 एप्रिल,2025 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परंतु, राज्य मंडळाच्या सचिवांच्या आदेशान्वये दि. 10 एप्रिल ते 14 एप्रिल,2025 या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल बंद राहणार असल्याने सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून खेळाडू विद्यार्थ्याचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी दि. 21 एप्रिल, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कळविले आहे.
त्यानुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी यांनी त्यानुषंगाने दि. 17 एप्रिल, 2025 पर्यंत आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रस्ताव भरुन घ्यावेत, त्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रीडा गुणांचे प्रस्ताव या कार्यालयामार्फत स्वीकारले जाणार नाहीत. खेळाडूं विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संस्था, शाळा सर्वस्वी जबाबदार राहतील, याची सबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment