05 April, 2025
सरस्वती विद्या मंदिर येथे बाल संसदेची स्थापना
हिंगोली (जिमाका), दि. 05 : हिंगोली येथील सरस्वती विद्यामंदीर येथे चाईल्ड हेल्पलाईन 1098 मार्फत "बाल संसद" स्थापन करून त्याबाबत जनजागृती करण्यात आली.
"बाल संसद" म्हणजे मुलांची संसद, जिथे मुले, त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात. बाल संसद मुलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे म्हणणे ऐकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. नेतृत्व, निर्णय क्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यास मदत करते. लोकशाही प्रक्रियाः बाल संसद लोकशाही प्रक्रियेद्वारे कार्य करते, मुले त्यांचे प्रतिनिधी निवडतात. शाळा आणि समाजात हक्कांचे संरक्षण हा उपक्रम मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्यात येते. बाल संसदेत प्रधानमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, आरोग्य मंत्री, कृषी मंत्री आणि पर्यावरण मंत्री अशा पदांवर मुलांची निवड केली जाते.
बाल हक्क व बालकाच्या समस्या सोडवण्यास त्यांना सक्षम करणे, बाल कायद्याची माहिती होणे यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून ग्राम, शहर, तालुका पातळीवर जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. यावेळी बाल संरक्षण अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी मार्गदर्शन केले.
बाल संसद स्थापन प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, गावातील नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला व बाल संसद कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चाईल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, केस वर्कर राजरत्न पाईकराव, सूरज इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोवितकर, श्रीमती ए.पी.इंगोले तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment