14 April, 2025

जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे आज उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि. 14 : जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे उद्घाटन व जलपूजन सोहळा उद्या मंगळवार, (दि.15) रोजी हिंगोली तालुक्यातील अंभेरी साठवण तलावाच्या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री नरहरी झिरवळ, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. सतीष चव्हाण, विक्रम काळे, डॉ. प्रज्ञा सातव, तानाजी मुटकुळे, चंद्रकांत नवघरे, संतोष बांगर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली मिना, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर कचलवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता सलीम शेख, संतोष बिराजदार, अण्णाराव कांबळे, अभय जगताप यांनी केले आहे. ******

No comments: