05 April, 2025
रुग्णवाहिका व स्कूल बसची तपासणी करुन घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या वाहनांची वाहन प्रणालीवर योग्यता प्रमाणपत्र अर्ज व फी भरणा करुन उप्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हजर करुन योग्यता प्रमाणपत्र तपासणी करुन घ्यावी. तसेच वैध योग्यता प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी शैक्षणिक सुट्टीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हजर करुन योग्यता तपासणी करुन घ्यावी.
रस्त्यावर विना योग्यता प्रमाणपत्र, मोटार वाहन कायदा अधिनियम व महाराष्ट्र शालेय अधिनियमाच्या तरतुदीचा भंग करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील रुग्णवाहिका धारकांनी तांत्रिक दृष्ट्या नादुरुस्त, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, विमा, पियुसी, कर संपलेली आहेत, अशांनी आपली वाहने दुरुस्त करुन कागदपत्रे विधीग्राह्य करुन योग्यता प्रमाणपत्रासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे घेऊन यावेत. तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार शुल्क भरुन पासिंग करुन घ्यावीत अन्यथा आपल्या वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेकिशक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment