13 January, 2026

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त विशेष कार्यक्रमाचे चित्ररथाद्वारे सादरीकरण

हिंगोली, दि. 13 (जिमाका) : नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त विशेष कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील प्राथमिक शाळेत चित्ररथाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या चित्ररथाद्वारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रभावीपणे देण्यात आली. चित्ररथातील दृकश्राव्य माध्यमे, माहितीफलक व संदेशफलकांद्वारे त्यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सहिष्णुता, धर्मसहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, हा उद्देश अधोरेखित करण्यात आला. या उपक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ******

No comments: