हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार सचिन जोशी, डी. एस. जोशी, सी. आर. गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
**
No comments:
Post a Comment