14 January, 2026

माहे डिसेंबर २०२५ चे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारीपर्यंत भरण्याचे आवाहन

हिंगोली, दि. १४(जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांच्या माहितीबाबत माहे डिसेंबर–२०२५ अखेरचे ई आर–१ त्रैमासिक विवरणपत्र दिनांक ३१ जानेवारीपर्यंत भरावयाची अंतिम मुदत आहे. सदर विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. माहे डिसेंबर–२०२५ अखेरचे ई आर–१ त्रैमासिक विवरणपत्र भरल्याची प्रत माहे जानेवारी–२०२६ च्या वेतन देयकासोबत जोडल्याशिवाय संबंधित कार्यालयांची वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत. जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपल्या लॉग-इनद्वारे ईमेल आयडी, संपर्क क्रमांक, कार्यालयाचा पत्ता, टॅन क्रमांक व पॅन क्रमांक नोंदवून आपली प्रोफाइल तातडीने अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. ***

No comments: