हिंगोली, दि. २७ ऑक्टो:- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, खांडेगाव ता. वसमत येथे 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, शिक्षण विस्तार अधिकारी जी. डी.साखरे
केंद्रप्रमुख श्रीमती जळकोटे
यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच निरोगी व निकोप आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता याविषयी आरोग्य शिक्षण देऊन जंत नाशक दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment