22 October, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीअंतर्गत कामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा; अपघातस्थळांची पाहणी करून अपघातांची क्रमवार यादी सादर करण्याचे निर्देश

 

        हिंगोली, दि. २२ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खांडेश्वरी येथील अपघातप्रवण स्थळावरील सुधारणा, ‘झिरो फॅसिलिटी डिस्ट्रिक्ट’ अंतर्गत करण्यात येणारी कामे तसेच प्रधानमंत्री राहत योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

        जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. या ठिकाणी घडलेल्या अपघातांची क्रमवार यादी तयार करून ती सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकारी व समिती सदस्यांना दिल्या.

        यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातप्रवण स्थळांवरील त्रुटींची पाहणी करून आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच रस्ता सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

No comments: