हिंगोली, दि. २१ (जिमाका) : हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटारसायकल संवर्गातील यापूर्वीची ‘MH38-AN’ ही वाहन क्रमांक मालिका संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता मोटारसायकल संवर्गासाठी ‘MH38-AP0001 ते MH38-AP9999’ ही नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू करण्यात येत आहे.
नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव ठेवायचा आहे, त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ऑनलाइन पद्धतीने विहित शासकीय शुल्क भरून आपला पसंतीचा क्रमांक राखीव करून घ्यावा.
वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मरगू जाधव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment