21 October, 2026

पेठवडगाव येथील रेणुका मंदिरात दसऱ्यानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न; ७७३ भाविकांची तपासणी

 

        हिंगोली  दि. 21 ऑक्टो (जिमाका):-  विजयादशमी व दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पेठवडगाव येथील प्रसिद्ध रेणुका मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दसऱ्यानिमित्त परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे उपस्थित राहतात. या मोठ्या जनसमुदायाचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

        प्राथमिक आरोग्य केंद्र पोतरा अंतर्गत उपकेंद्र पेठवडगाव यांच्या वतीने हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या घेण्यात आले.

७७३ भाविकांची विविध आजारांची तपासणी

        या आरोग्य शिबिराला आजूबाजूच्या विविध गावांतील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात एकूण ७७३ भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

३० वर्षांवरील सर्व नागरिकांची रक्तदाब आणि मधुमेह  यांची प्राधान्याने तपासणी करण्यात आली.

        मुखरोग,(ओरल कॅन्सर), शरीरावरील गाठी व कॅन्सरविषयक संशयित लक्षणे यांची सखोल तपासणी करण्यात आली.

         पावसाळ्यानंतर वाढणाऱ्या डेंग्यूच्या आजाराला आळा घालण्यासाठी भाविकांना खबरदारीच्या उपाययोजना सांगून जनजागृती करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना जागीच आयुष्मान भारत कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

        सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ मदन गारोळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मगर, डॉ. स्वाती मगर, आरोग्य निरीक्षक श्री. डी. बी. वाघमारे, आरोग्य निरीक्षक श्री. एस. टी. साबळे, आरोग्य कर्मचारी श्री. व्ही. टी. मगर, श्री. बाळासाहेब रणखांब, श्री. वागडव्ह आणि आशा वर्कर यांनी परिश्रम घेत

No comments: