15 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 02 रुग्ण ;  तर 04 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 15 : जिल्ह्यात 02 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे औंढा परिसरात 01 व्यक्ती व आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती असे एकूण 02 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 33 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 637 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

No comments: