23 September, 2021

 

कोरोना लसीकरणाची सक्तीने अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका) दि.23 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अगत्याचे झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारचे आस्थापना, दुकाने, रेशन दुकाने, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, बँकेतील अधिकारी-कर्मचारी यांनी तात्काळ कोरोना लसीकरण करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सदर सूचनांचे पालन होत आहे किंवा कसे याची माहिती, आढावा घेण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी खालीप्रमाणे आदेश दिले आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र, कृषी संबंधित साहित्य विक्री या दुकानदारांचे व त्यांचे इथे काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे किंवा कसे याबाबत पाहणी करावी व संबंधितांवर पोलीस विभाग, मुख्याधिकारी न.प.-न.पं आणि आपल्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सदर दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ लसीकरण करुन घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, परभणी / सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं / पोलीस विभाग यांनी  जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, हॉटेल रेस्टॉरंट, औषधी दुकाने या दुकानदारांचे व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे किंवा कसे याबाबत पाहणी करावी व संबंधितांवर पोलीस विभाग / मुख्याधिकारी न.प.-न.पं आणि आपल्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सदर दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ लसीकरण करुन घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग हिंगोली व पोलीस विभाग यांनी जिल्ह्यातील सर्व दारु विक्री दुकाने, वाइन बियर शॉप, वाइन बार या दुकानदारांचे व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे किंवा कसे याबाबत पाहणी करावी व संबंधितांवर पोलीस विभाग / मुख्याधिकारी न.प.-न.पं आणि आपल्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सदर दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ लसीकरण करुन घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

जिल्हा पुरवठा विभाग / तहसील कार्यालयांनी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार व त्यांचे इथे काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे किंवा कसे याबाबत पाहणी करावी व संबंधितांवर पोलीस विभाग / मुख्याधिकारी न.प.-न.पं आणि आपल्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सदर दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ लसीकरण करुन घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

गट विकास अधिकारी / ग्रामसेवक / पोलीस विभाग यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व दुकाने, आठवडी बाजारातील विक्रेते यांचे लसीकरण झाले आहे किंवा कसे याबाबत पाहणी करावी व संबंधितांवर पोलीस विभाग, आपल्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सदर दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ लसीकरण करुन घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

तहसीलदार / मुख्याधिकारी न.प.-न.पं / पोलीस विभाग यांनी शहर स्तरावरील उर्वरित सर्व दुकाने / आस्थापनातील दुकानदार व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे किंवा कसे याबाबत पाहणी करावी व संबंधितांवर पोलीस विभाग / मुख्याधिकारी न.प.-न.पं आणि आपल्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच सदर दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ लसीकरण करुन घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

शिक्षण विभागांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक / अध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थी (१८ वर्ष वरील) यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करुन घेणे बाबत योग्य ती कार्यवाही करावी.

व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक यांनी जिल्ह्यातील सर्व बँकेतील अधिकारी / कर्मचारी यांचे व त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे लसीकरण करुन घेणे बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

यानुसार वरीलप्रमाणे आदेश  निर्गमित करण्यात येत आहेत. या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावरआपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

वरीलप्रमाणे आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली, सहा.आयुक्त, अन्न व औषध प्रशासन हिंगोली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं व जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख यांची असेल.

*******

No comments: