20 September, 2021

 

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा हिंगोली दौरा

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 20 :  राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड ह्या दि. 21 सप्टेंबर, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे .

मंगळवार, दि. 21 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 7.15 वाजता परभणी येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता स्व. खा. संसदरत्न राजीव सातव नाट्यगृह नामफलकाचे अनावरण , सकाळी 10.30 वाजता हिंगोली नगरपरिषदेअंतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरण कामाचे उद्घाटन, सकाळी 11.00 वाजता  चिंचोली ता. हिंगोली येथे आरोग्य शिबिरांचे उद्घाटन, दुपारी 12.00 वाजता कळमनुरी विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 1.30 वाजता कळमनुरी येथे स्व. खा. राजीव सातव यांच्या जीवनावरील संसदरत्न ग्रंथ प्रकाशन सोहळा. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेडकडे मोटारीने प्रयाण.

*****

No comments: