09 September, 2021

 

रेशीम तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाची सांगता

 

हिंगोली (जिमाका), दि. 9 :  एस.बी.आय आर.से.टी    जिल्हा रेशीम कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हयातील रेशीम शेतकऱ्यांना दि.31 ऑगस्ट, 2021 ते 09 सप्टेंबर, 2021 या कालावधीमधे रेशीम उद्योगाचे तांत्रिक, उद्योजकता प्रशिक्षण एस.बी.आय आर.से.टी येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाची सांगता आज करण्यात आली.

या प्रशिक्षणामध्ये  रेशीम उद्योगाविषयीचे  संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण तसेच उद्योजकता विकास याबाबत 10 दिवस मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात एस.बी.आय आर.से.टीचे संचालक डी. एम. बोईले,  वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशोक वडवळे , एस.बी.आय आर.से.टीचे विजय खिल्लारे, श्रीमती. मुळे , कु. रुपलक्ष्मी जैस्वाल   सेवानिवृत जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदिपान ढावरे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला चुंचा, तोंडापुर, आरळ, आंबा करंजी येथील 29 प्रशिक्षणार्थी 10 दिवस उपस्थित होते.

          आज दि.09 सप्टेंबर, 2021 रोजी 29  प्रशिक्षणार्थींची  लेखी मौखिक 300 गुणांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे ऋषीकेष कोंडेकर हे  मुख्य  परीक्षक  म्हणून उपस्थित  होते. या परिक्षेत 29 शेतकरी  यशस्वीरित्या उतीर्ण झाले असून त्यांना त्याबाबतचे प्रमाणत्र देण्यात आले .

******

No comments: