09 September, 2021

 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 9 : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्या प्रमाणेच हिंगोली शहरात देखील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे दृष्टीने बंदोबस्त लावण्यात येतो. परंतू या सणाचे काळात मानापानाचे कारणावरुन किंवा इतर शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची  परिस्थिती अचानक निर्माण होते. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 अन्वये शक्तीचा वापर करुन दि.10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर, 2021 पर्यंत उद्भवणारी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  सर्व 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

वसमत येथील शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी  उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी प्रविण फुलारी, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमत येथील तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अरविंद बोळगे,  कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमत येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. पळसकर, वसमत, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोलीचे  उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, नर्सी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोलीचे  तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी संदिप राजपुरे, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गळगे, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे  प्र. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी एस.सी. पाचपुते, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागचे नायब तहसीलदार श्री. पाठक, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी औंढाचे  तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सचिन जोशी, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगावचे  तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यु.आर. बोथीकर, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी.के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपरोक्त प्रमाणे नियुक्त केलेल्या दंडाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दी पावेतो दिनांक 10 सप्‍टेंबर, 2021 रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे व तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी  यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशन शिवाय त्यांच्या तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

******

No comments: