16 September, 2021

 

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीची

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्याकडून पाहणी

 


हिंगोली, (जिमाका) दि. 16 : अतिवृष्टीने व पुराने बाधित झालेल्या वसमत तालुक्यातील आरळ या गावासह परिसरातील शेतीच्या नुकसानीची पाहणी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज केली.

यावेळी त्यांनी बाधित झालेल्या शेतक-यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना धीर दिला व तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन देताना महसूल व कृषि विभागाच्या अधिका-यांना तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. आमदार राजू नवघरे यांनी संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होवू नये यासाठी वसमत तालुक्यातील नद्यांचे खोलीकरण करण्यासाठी  निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

यावेळी वसमत तालुक्यातील शेतकरी, पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार श्री. बोळंगे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड उपस्थित होते.

*****

No comments: