12 October, 2022

 

वसमत कृषि उत्पन्न बाजार समिती मतदारांची प्रारुप यादी प्रसिध्द

21 ऑक्टोबर पर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 12 : महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 14 (1) नुसार व शासनाच्या 29 सप्टेंबर, 2007 च्या अधिसूचना, सहकार व पणन विभागाच्या प्रधान सचिवाच्या दि. 3 नोव्हेंबर, 2007 च्या आदेशानुसार व बाजार समित्या (समितीची निवडणूक) (पहिली सुधारणा) नियम 2020 नुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली यांनी या अधिसूचनेद्वारे वसमतच्या कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील दि. 1 सप्टेंबर, 2022 या अर्हता दिनांकावरील सहकारी संस्था मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदार संघ, हमाल व तोलारी मतदार संघ असे मतदार संघनिहाय तयार करण्यात आलेल्या मतदाराच्या प्रारुप स्वरुपातील याद्या प्रसिध्द केल्या आहेत.

या याद्या आज दि. 12 ऑक्टोबर, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येऊन याद्या कृषि उत्पन्न बाजार समिती, वसमत, सहायक निबंधक,सहकारी संस्था,वसमत, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था कार्यालय,हिंगोली येथे अवलोकनार्थ ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 14 (1) नुसार या याद्याबाबत हरकती नोंदविण्यासाठी आवश्यक त्या पुराव्यासह स्वत: किंवा पोस्टाने दि. 12 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर, 2022 रोजी किंवा तत्पूर्वी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला रोड, हिंगोली या कार्यालयास मिळेल अशा बेताने पाठवावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व हिंतसंबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

******

No comments: