06 October, 2022

 

हिंगोली शहरातील कळमनुरी रोडवरील रेल्वे ब्रिजच्या कामासाठी

8 ऑक्टोबर पासून वाहतूक मार्गात बदल

 

            हिंगोली (जिमाका), दि. 06 : हिंगोली शहरातील कळमनुरीकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे गेट नं. 144 बी येथे रेल्वे ब्रिजचे काम काम करावयाचे असल्याने जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन दि. 8 ऑक्टोबर, 2022 पासून पुढे 60 दिवसांसाठी मोठी वाहने हिंगोली शहरातून कळमनुरीकडे जाणारी वाहने अकोला बायपास गारमाळ वरुन खटकाळी बायपास मार्गे जातील. तर कळमनुरीकडून हिंगोली शहरात येणारी वाहने त्याच मार्गाने खटकाळी बायपास येथून गारमाळ पुढे अकोला बायपास येथून येतील . 

            तसेच लहान चारचाकी व दुचाकी वाहने रेल्वेगेट शेजारी तात्पुरते निर्माण केलेल्या पर्यायी मार्गाने हिंगोलीकडून कळमनुरीकडे जातील. त्यांनी नवीन बनत असलेला रेल्वे भुयारी पूल पुढे खटकाळी हनुमान मंदिर-खटकाळी बायपास असा मार्ग असेल. तर कळमनुरीकडून हिंगोली शहरात येणारी चारचाकी व दुचाकी वाहने ही खटकाळी बायपास येथून पुढे खटकाळी हनुमान मंदिर पुढे समोर जाऊन उजव्या बाजूने नवीन पर्यायी बनविलेला कच्चा रस्ता भुयारी पूल पुढे जिनमाता नगरमधील सिमेंट रस्त्याने हिंगोली शहरात जातील. अशा प्रकारे वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे.

            या आदेशाची माहिती पोलीस अधिकारी वाहतूक यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्द करावी. सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलीस स्टेशन कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत.

*****

No comments: