14 October, 2022


 

नेहरु युवा केंद्रातर्फे समगा येथे स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील नेहरु युवा केंद्र व युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार  यांच्या वतीने स्वच्छ भारत  अभियान 2.0 चा कार्यक्रम पूर्ण भारतात 02 आक्टोंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत चालू आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील समगा या गावी  स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी गावातील सर्व गाव  परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील प्लास्टिक कचरा एकत्र जमा करुन  त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच नेहरु युवा केंद्राच्या युवा कर्मिने गावात स्वच्छतेची शपथ दिली व गावातील लोकांना प्रत्येकाने आपला गाव, आपला परिसर, आपले घर कसे स्वच्छ ठेवले पाहिजे आणि ते ठेवल्याने आपण होणाऱ्या रोगराईपासून कसे दूर राहू याविषयीची माहिती  देत स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले.

हा कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक प्रवीण पांडे, नामदेव फरकांडे, सिंधू केंद्रे, गजानन आडे, दीपक नागरे यांनी आयोजित केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, गावातील युवा, युवती ,सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती.

*****

No comments: