04 October, 2022

 

खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी

वास्तुविशारदांनी निविदा सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, दिल्ली व्दारा खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा सुविधा निर्मिती करण्यासाठी देशातील विविध जिल्ह्यात 1) सिंथेटीक अॅथेलेटिक्स ४०० मी धावनपथ तयार करणे, 2) सिंथेटीक हॉकीचे मैदान तयार करणे, 3) सिंथेटीक टर्फ फुटबॉल मैदान तयार करणे, 4) बहुउद्देशीय हॉल बांधकाम (60 मी x 40 x 12.50 मी), 5) जलतरण तलाव, 6) जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी स्टेडियमचे बांधकाम करणे (गॅलरी व डोमसह) इत्यादी सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीस अनुदान देण्यात येते.

त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात प्राधान्य क्रमाने 1) सिंथेटीक अॅथेलेटिक्स 400 मी धावनपथ तयार करणे,                2) बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे, 3) सिंथेटीक टर्फ फुटबॉल मैदान तयार करणे इत्यादी पायाभूत क्रीडा सुविधांचे खाजगी वास्तुविशारदाद्वारे अंदाजपत्रक व आराखडे तयार करुन घेण्यासाठी क्रीडा विषयक कामांचे अनुभव असलेले नोंदणीकृत वास्तुविशारदांनी वरील नमूद कामांचे दरपत्रक (निविदा) जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता येथे दि. 06 ऑक्टोबर, 2022 ते दि. 14 ऑक्टोबर,2022 या कालावधीत सादर करावेत. तद्नंतर आलेल्या निविदांचा विचार करण्यात येणार नाही.

वरील बाबींचे अनुदान मंजुर झाल्यानंतरच निवड करण्यात आलेल्या निविदाधारक वास्तुविशारदाचे मानधन (देयक) अदा करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील वास्तुविशारद यांना प्राधान्य देण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी , हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: