09 October, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 09 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: