01 October, 2022

 

हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव निमित्त भरगच्च क्रीडा स्पर्धाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवानिमित्त सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने दिनांक 1 ऑक्टोबर पासून 4 ऑक्टोबर, 2022 पर्यंत विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जीनियस स्पोर्ट्स अकॅडमी एनटीसी हिंगोली येथे बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होईल. तेथे 1 व 2 ऑक्टोबर रोजी दोन दिवस विविध गटांमधील स्पर्धा होतील.

स्वर्गीय ॲड. पंजाबराव देशमुख क्रीडांगण, शिवलीला पॅलेस शेजारी, अकोला रोड हिंगोली येथे          1 आक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 06:30 वाजता लॉन टेनिस या क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ होईल. 

पिडीसीसी बँक हिंगोली येथे 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हॉलीबॉल या स्पर्धांचा प्रारंभ होणार आहे. 

रामलीला मैदान हिंगोली येथे 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पासून विविध वयोगटाच्या कुस्त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हा परिषद बहुविध प्रशाला मैदान हिंगोली येथे 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कबड्डी या क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ होणार आहे.

या विविध क्रीडा प्रकारामध्ये खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. तसेच नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहून क्रीडा स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीचे सचिव तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले आहे.

*******

No comments: