14 October, 2022

 

सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करावा

                                        - समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे निर्देश

* हिंगोली येथील समाज कल्याण कार्यालयात 15 ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना होऊन तब्बल 90 वर्ष पूर्ण होत आहेत.  90 वर्षापूर्वी दि.15 ऑक्टोबर, 1932 रोजी समाज कल्याण विभागाची स्थापना मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून झालेली आहे.  त्यामुळे हा दिवस शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करावा,  अशा सूचना समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.

या निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली  येथे दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वा. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत मान्यवरांची व्याख्याने व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यांत येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***** 

No comments: