04 October, 2022

 

हिंगोली नगर रचना कार्यालयासाठी बाह्य यंत्रणेद्वारे शिपाई उपलब्ध करुन देण्यासाठी

मान्यताप्राप्त संस्थेनी दरपत्रके सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : येथील सहायक संचालक नगर रचना कार्यालयातील शिपाई या वर्ग-4 च्या रिक्त पदाचे काम बाह्य यंत्रणेद्वारे मान्यताप्राप्त संस्था, कंपनी यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. यासाठी मान्यताप्राप्त संस्था, कंपनी यांच्याकडून किमान चौथी पास असणाऱ्या दोन उमेदवारांची सेवा निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत.

ही दरपत्रके सिलबंद पाकिटात बातमी प्रसिध्द झाल्यापासून दि. 11 ऑक्टोबर, 2022 रोजी 5.00 वाजेपर्यंत सहायक संचालक नगर रचना, हिंगोली यांच्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने पाठविण्यात यावे. प्राप्त दरपत्रके दि. 12 ऑक्टोबर, 2022 रोजी दु. 12.00 वाजता उघडण्यात येतील. यासंबंधीच्या अटी व शर्ती या कार्यालयाच्याच्या सूचना फलकावर पहावयास मिळतील. कार्यालयाचा पत्ता : सहायक संचालक , नगर रचना, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष एस-3, हिंगोली-431513 असा आहे, सहायक संचालक, नगर रचना, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

******

No comments: